आरोग्य व्याख्यानमाला संपन्न

18 Jan 2022 16:01:43
health lecture
 
 
 
डोंबिवली: डोंबिवलीतील टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने दि.१३ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर हा आठवडा आरोग्य व्याख्यानमाला म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींची विविध विषयांवरून व्याख्याने आयोजित केली होती. ’जागतिक मधुमेह दिन’ या दिवशी व्याख्यानातील पहिले पुष्प गुंफताना डॉ. धनंजय गद्रे व डॉ. पुष्कर वाघ यांनी ’मधुमेह’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आपला विषयाबद्दल प्रतिपादन करताना ते असे म्हणाले की,’’शुद्ध आणि सकस आहार सोडून ’फास्ट फूड’ आणि ’जंक फूड’ चे आकर्षण आपल्याला मधुमेहाकडे घेऊन जात आहे.’’ डॉ. दुष्यंत भादलीकर यांनी ’व्यसनाचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करताना ड्रग्जपेक्षाही घातक ठरू पाहणारे मोबाईलचे व्यसन यावर अधिक भाष्य केले. मोबाईलचा अतिरेक व्यक्तीचे, कुटुंबाचे, समाजाचे पर्यायाने संपूर्ण राष्ट्राचे आरोग्य खराब करण्यास कारणीभूत ठरत असल्याचेेही ते म्हणाले.
वैद्य विनय वेलणकर यांनी ’आदर्श दिनचर्या’ या विषयावर संवाद साधताना सकाळी उठण्याची वेळ, व्यायाम, अभ्यंगस्नान, आहार, आहाराची वेळ, निद्रासमय कसा असावा हे सांगून व्यायामाच्या प्रकारात सूर्यनमस्कार हा सर्वोत्तमव्यायामअसून प्रत्येकाने दररोज सूर्यनमस्कार घातला पाहिजे, असा आग्रह ही धरला. टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मृणाल जोशी यांनी योगविषयक मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थांकडून योगासनांचा अभ्यास करून घेतला. चंद्रकांत जोशी यांनी ’आदर्श युवती सिस्टर निवेदिता’ या विषयावरील भाषणात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव सिस्टर निवेदिता यांच्यावर कसा पडला होता, हे सांगून सिस्टर निवेदिता यांचे कार्य त्यांची महानता नेमक्या शब्दांत सांगून मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच आपले बौद्धिक आरोग्य ही कसे सांभाळले पाहिजे, हे पटवून दिले. या व्याख्यानमालेचे आयोजन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह डॉ.महेश ठाकूर यांनी केले.
डोंबिवली: डोंबिवलीतील टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने दि.१३ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर हा आठवडा आरोग्य व्याख्यानमाला म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींची विविध विषयांवरून व्याख्याने आयोजित केली होती. ’जागतिक मधुमेह दिन’ या दिवशी व्याख्यानातील पहिले पुष्प गुंफताना डॉ. धनंजय गद्रे व डॉ. पुष्कर वाघ यांनी ’मधुमेह’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आपला विषयाबद्दल प्रतिपादन करताना ते असे म्हणाले की,’’शुद्ध आणि सकस आहार सोडून ’फास्ट फूड’ आणि ’जंक फूड’ चे
Powered By Sangraha 9.0